उरुळी कांचन येथे केली क्रूरपणे मासेमाऱ्याची हत्या, हातपाय व शीर केले धडा वेगळे

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

लोणी काळभोर: (उरुळी कांचन )पिंपरी सांडस (ता. हवेली ) येथील भीमा नदी किनाऱ्यावरील पुलाजवळ शुक्रवारी (दि.४) रोजी शीर , दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून, छाटलेला सापडलेल्या मृतदेहाचा रविवार (दि.६) रोजी शीराचा व हाताचा भाग उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील जुन्या तांबेवस्ती जवळ एका ओढ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शीराचा भाग या ठिकाणी सापडल्याने उरुळी कांचन हद्दीत खून घडला असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.

संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय -४५ , रा. भवरापूर , ता.हवेली ) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. संतोष यांचा मासेमारी करण्याचा व्यवसाय होता. संतोष हा मंगळवार ( दि.१) भवरापूर येथून बहिणीकडे जातो म्हणून बाहेर पडला होता. थेट त्यांचा मृतदेह शरीराचे धड व पात – पाय छाटलेल्या अवस्थेत (दि.४) रोजी सापडला होता.

त्यानंतर लोणीकाळभोर पोलिसांना रविवारी (दि.६) रोजी दुपारी चार वाजता स्थानिकाने खबर देऊन माहिती दिल्याने पोलिसांना संतोष गायकवाड यांचे शीर व एका हाताचा भाग सापडला आहे. संतोष गायकवाड हे भिमा व मुळा मुठा नदीवर अनेक वर्षे मासेमारी व्यवसाय करीत होते. संतोष यांचा खून इतक्या क्रूरपध्दतीने का झाला ? असा प्रश्न खूनाचा प्रकार समोर आल्यानंतर झाला आहे. अद्याप या मृतदेहाचे एक हात व दोन्ही पाय गायब असल्याने या खूनाच्या तपासाचा उलगडा होणे बाकी आहे.

दरम्यान या ठिकाणी लोणीकाळभोरचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे , लोणीकंदचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एम.के. पाटील , लोणीकाळभोरचे उपनिरीक्षक सदाशिव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्हाचा पुढील तपास लोणीकाळभोर पोलिस करीत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.