पूर्व हवेली मध्ये ऐअरटेल या कंपनीचे मोबाईल नेटवर्क नसल्या मुळे नागरिक त्रस्त

Rokhthok Maharashtra 1 0

हवेली प्रतिनिधी:- अमन शेख

पुणे- सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी कोरेगाव मुळ, उरुळी कांचन, परिसरात चार वाजल्यापासून ऐअरटेल या कंपनीच्या मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्राहक चांगलेच
मेटाकुटीला आले होते.

दुसरीकडे या मोबाईल कंपन्या भरमसाठ पैसै आकारुन लोकांना हवी ती सुविधा देण्यास असमर्थ ठरल्याचे दिसून येत आहे .
काल दुपारी चार वाजल्या पासून ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत पुर्व हवेलीत एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क नॉट रिचेबल असे सागंत होते.
सध्या पूर्व हवेलीतील सर्वच भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता टॉवरची संख्या कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कॉल ड्रॉप आणि रेंज प्रॉब्लेम या समस्यामुळे एअरटेल कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
या नेटवर्क समस्यांमुळे बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल फोनवर फोन पे, गूगल पे, अमेझॉन पे, भारत पे, पेटीयम यासारख्या डिजिटल व्यवहार करण्यासाठी नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे व्यवहार खोळंबलेले दिसत होते. मोबाईल नेटवर्क मुळे कॉल ड्रॉप होणे, आवाज ऐकायला न येणे, , फोन ज्याला लावला आहे तो सोडून दुसरीकडेच लागणे, पूर्व हवेलीतील ऐअरटेल या कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.