पिंपरीत अपघातात बहीण-भावाचा मृत्यू; कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय!

Rokhthok Maharashtra 10 0

पिंपरी-चिंचवडमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घोरावडेश्वर येथून परतणाऱ्या बहीण-भावाच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने मागून धडक दिली. निगडीजवळील पूना गेट हॉटेल परिसरात झालेल्या या अपघातात २१ वर्षीय कौशिक मुल्या आणि १७ वर्षीय ऋषिता मुल्या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोघेही भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात राहत होते. कौशिक हा आळंदीतील महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता, तर ऋषिता अकरावीत शिक्षण घेत होती.
अपघातानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान कौशिकचा मृत्यू झाला, तर ऋषिता मेंदूमृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या दुःखद प्रसंगातही मुल्या कुटुंबीयांनी ऋषिताचे अवयवदान करण्याचा निर्णय घेत माणुसकीचे दर्शन घडवले. स्वतःच्या दुःखावर मात करत दुसऱ्यांना जीवनदान देण्याचा घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.