पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल! पतीसह प्रेयसीवर गुन्हा

Rokhthok Maharashtra 8 0

पत्नीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल! पतीसह प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल!
नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे खासगी आणि अश्लील फोटो काढून ते प्रेयसीला पाठवल्याचा, तसेच ते फोटो नातेवाईकांमध्ये आणि सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप पती आणि त्याच्या प्रेयसीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी ३५ वर्षीय पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पती पत्नीचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय काढत असल्याचा आरोप आहे. याला विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर हे खासगी फोटो प्रेयसीला व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आले. संबंधित प्रेयसीने ते फोटो महिलेच्या नातेवाइकांना पाठवल्याचा आणि सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित महिलेची बदनामी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
खासगी छायाचित्रांचा गैरवापर आणि सोशल मीडियावरील बदनामीच्या या प्रकारामुळे महिलांच्या डिजिटल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.