फोटो काढल्याच्या रागातून हात पिरगळल्याची घटना : महिलेला अटक

Rokhthok Maharashtra 1 162

पुणे :  – शहरात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना थांबत नसून
झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी थांबविल्यानंतर दंडात्मक कारवाईसाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याने फोटो काढल्याच्या रागातून त्यांचा हात पिरगळल्याची घटना घडली. पोलिसांनी त्या महिलेला अटक केली.

अनुया सोदे (वय २५, रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक ए. ए. दिवेकर यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी महिला पोलिस कर्मचारी ए. दिवेकर मुंढवा चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या अनुयाने दुचाकी झेब्रा क्रॉसिंगवर उभी केली. त्यामुळे दिवेकर यांना त्यांचा कारवाईसाठी फोटो काढला. मात्र फोटो काढल्याचा राग आल्याने महिलेने त्यांच्याशी वाद घातला. तसेच अनुया यांनी दिवेकर यांचा हात पिरगळून अपशब्द वापरले. अधिक तपास सहायक निरीक्षक रेजितवाड तपास करीत आहेत.

0 0 votes
Article Rating
162 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.