वाढदिवसाला केक नाही, रक्तदान! शुभम पवारांचा अनोखा सामाजिक उपक्रम

Rokhthok Maharashtra 2 0

नाशिकमध्ये उद्योजक शुभम पवारांचा अनोखा वाढदिवस; रक्तदान शिबिरातून दिला सामाजिक संदेश!
वाढदिवस म्हटलं की केक, फटाके आणि महागड्या भेटवस्तू… मात्र नाशिकच्या सिडको परिसरातील उद्योजक शुभम पंढरीनाथ पवार यांनी हा पारंपरिक पायंडा मोडत सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा केला.
7 ऑगस्ट 2026 रोजी त्रिमूर्ती परिसरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक, युवक, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे, शुभम पवार यांनी चाहत्यांना केक, बुके किंवा महागड्या भेटवस्तू न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी पेन, पेन्सिल, पुस्तके, पाण्याच्या बाटल्या आणि रेनकोट यांसारख्या उपयोगी वस्तू आणण्याचे आवाहन केले होते.
‘जगात भारी – द फोन रूम’ या व्यवसायातून ग्राहकांचा विश्वास संपादन करणारे शुभम पवार सामाजिक कार्यातही सक्रिय असल्याचे यावेळी दिसून आले.
वाढदिवसाचा खर्च केवळ सेलिब्रेशनवर न करता समाजोपयोगी उपक्रमासाठी देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.