क्राईम सीरिज पाहून हत्येचा कट? दिल्ली हादरली!

Rokhthok Maharashtra 22 0

दिल्लीतील गगन विहार परिसरात ६२ वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंटवर पत्नीच्या हत्येचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कमल सिंह याने क्राईम वेब सीरिजमधून प्रेरणा घेत पत्नी कोमल सिंह यांच्या हत्येचा कथित कट रचला. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच १२ लाख ७५ हजार रुपये घेऊन नेपाळला पळून जाण्याची तयारी केल्याचेही समोर आले आहे. तपासानंतर चार दिवसांनी मथुरा रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.