पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी; तलाठी आणि कोतवालावर एसीबीचा गुन्हा!

Rokhthok Maharashtra 29 0

पुण्यातील शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण समोर आले आहे. सेनापती बापट रोडवरील एका कमर्शियल प्रकल्पाच्या पाया खोदकाम प्रकरणात तब्बल १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी महिला तलाठी आणि कोतवालाविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोदकाम कंत्राटदाराला ३ हजार २०० ब्रास जादा खोदकाम झाल्याचा दावा करत तब्बल २ कोटी रुपयांचा दंड होईल, अशी भीती दाखवण्यात आली. हा अहवाल तहसीलदारांकडे अनुकूल पाठवण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे आणि कोतवाल महेश मधुकर मुंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू असून, सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराविरोधात ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.