सावित्रीबाई फुले स्त्रीशिक्षणाच्या जनक – उपमुख्याध्यापिका योजना निकम .

Rokhthok Maharashtra 15 0

हडपसर,वार्ताहर. थोर समाजसुधारक,विचारवंत,लेखक,महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण ,अस्पृश्य उद्धार आणि समाजसुधारणेचा वसा घेतला होता.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाचे बहुमोल कार्य केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगणाऱ्या अशा थोर महापुरूषांचे विचार आपण आचरणात आणावेत. सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने स्त्रीशिक्षणाच्या जनक होत्या असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम यांनी केले.

 

साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त
आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात विवेक राख,ओम बोबडे,श्रीराज साळुंके या
विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनुराधा ननवरे यांनी शिक्षक मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या समग्र जीवनकार्याची आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर,धनाजी सावंत सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष केंगले यानी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले.तर आभार स्मिता पाटील यांनी मानले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.