नाणेघाटात दुर्दैवी घटना! फिरायला गेलेल्या पुण्याच्या २२ वर्षीय तरुणाचा दरीत पडून मृत्यू

Rokhthok Maharashtra 29 0

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नाणेघाट येथे फिरायला गेलेल्या तीन मित्रांपैकी एका २२ वर्षीय तरुणाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.
मृत तरुणाचे नाव दत्ता विनायक लोंढे असून तो आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील रहिवासी होता. रविवारी सकाळी दाट धुके आणि पावसाच्या वातावरणात कड्याजवळ फिरत असताना त्याचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला.
घटनेनंतर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मुसळधार पाऊस, निसरडा परिसर आणि दाट धुके यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. मोबाईल लोकेशनच्या मदतीने तब्बल दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर खोल दरीतुन त्याचा मृतदेह काढण्यात आला.
दरम्यान, पावसाळ्यात नाणेघाट परिसरात फिरताना पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.