सासवड Crypto Fraud मध्ये मोठी अपडेट! २१.७५ लाखांची फसवणूक; २ आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Rokhthok Maharashtra 2 0

सासवडमध्ये २१ लाख ७५ हजारांच्या क्रिप्टो गुंतवणूक फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
क्रिप्टो करन्सीमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत २१ लाख ७५ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी संकेत रघुनाथ इनामके आणि संतोष पोपट कटके यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे ॲड. पवन कुलकर्णी आणि ॲड. महेश बापट यांनी काम पाहिले.
तक्रारीनुसार, TRILLIONER कंपनीच्या TLC 2.0 प्री-लाँच क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास ४० टक्के बोनस कॉईन, दरमहा ४ ते ५ टक्के परतावा आणि गुंतवणुकीवर दुप्पट ते पाचपट नफा मिळेल, असे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे.
गुंतवणूक केल्यानंतर पैसे परत मिळण्यास टाळाटाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अटकपूर्व जामीन फेटाळल्याने संबंधित आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सासवड पोलिसांकडून सुरू असून, या कथित गुंतवणूक प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी आणि कोट्यवधी रुपयांची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.