थेट घोषणा! जरांगेंच्या ‘या’ 5 मागण्या मान्य; अंतरवाली सराटीत रात्री मोठी घडामोड
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत अंतरवाली सराटीत मोठी घडामोड समोर आली आहे!
२९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा काल सातवा दिवस होता. आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने तब्बल अडीच तास चर्चा केली. या चर्चेनंतर जरांगे यांच्या पाच प्रमुख मागण्या मान्य झाल्याची घोषणा करण्यात आली.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ सप्टेंबरपासून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.
तसंच प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी नोडल अधिकारी नेमला जाणार आहे. मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती संपूर्ण मराठवाड्यात दौरा करणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
शैक्षणिक शुल्काबाबतही सरकार सकारात्मक असून, जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे, त्यांना पैसे परत करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
मात्र, पाच मागण्या मान्य झाल्या तरी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. पाणी पितो, सलाईन लावतो, मात्र उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
११ तारखेला मागण्या मान्य झाल्यास मुंबईत गुलाल घेऊन येऊ आणि १२ तारखेच्या बैठकीत पुढील निर्णय घेऊ, असा निर्धारही जरांगेंनी व्यक्त केला आहे.
आता सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.





