भेकराईनगर येथील डॉक्टरचे अपहरण करून २५ लाख रुपये लुटणाऱ्या सहा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक. प्रतिनिधी- स्वप्नील कदम

Rokhthok Maharashtra 1 0

लोणी काळभोर (पुणे) :भेकराईनगर येथील जनावरांचा डॉक्टर, त्याने सोडुन दिलेली त्याची पहिली पत्नी, पहिल्या पत्नीची धाकटी भावजय व भावजयीचा प्रियकर त्यातुन घडवले डॉक्टरचे अपहरण व डॉक्टराकडुन उकळलेली सत्ताविस लाखांची खंडणी असे चित्रपटालाही लाजवेल असे कथानक असलेल्या किचकट गुन्हाचा तपास करून, फुरसुंगी येथील जनावराच्या डॉक्टरचे अपहरन करून, त्याच्याकडुन सत्ताविस लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एक महिला, एक तृतीयपंथी व चार तरुण अशा सहा इंदापुर तालुक्यातील आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

 

राहुल दत्तु निकम (वय २७, रा. मु. पो. शहा, ता.इंदापुर, जि. पुणे) हे या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपींचे नाव असून, लोणी काळभोर पोलिसांनी राहुल निकम, त्याची प्रियसी विदया नितीन खळदकर (वय ३५, रा. ढगेमळा, कुर्डुवाडी रोड, ता. बार्शी जि. सोलापुर) हिच्यासह राहुलचे सहकारी माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षिरसागर, मुळ रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापुर जि. पुणे सध्या रा. मु. पो. शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापुर), नितीन बाळु जाधव (२५, रा. मु. पो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे), सुहास साधु मारकड (वय २८, रा. मु. पो. पडस्थळ, ता. इंदापुर), संतोष धोंडीबा गौजारी ऊर्फ राणी पाटील (तृतिय पंथी), वय ३४, रा. मुळ रा. जगलबेट, ता. जोखाडा, जि. कारवार, कर्नाटक सध्या. मु. पो. लोणी देवकर, ता. इंदापुर) या सहा जनांना मोठ्या सीताफिने अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी वरील सहा आरोपींच्याकडून गुन्हयात वापरलेली रेनॉल्ट कंपनीची क्विड कार मारुती स्विफ्ट डिझायर कार, बजाज प्लॅटीना मोटारसायकल, हिरो कंपनीची स्पोर्टस बाइक, तक्रारदार यांचा तोडुन फोडून फेकुन दिलेला मोबाईल हॅन्डसेट, तसेच आरोपीतांचे वापरते एकुण ६ मोबाईल हॅन्डसेट, सोन्याचे दागीने तसेच गुन्हयात लुटलेली बारा लाख रुपये रोख रक्कम असा एकुण तब्बल २२ लाख ५५ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान डॉ. प्रदिप मारुती जाधव हे त्या अपहरण झालेल्या फुरसुंगी येथील पशुवैद्यकिय अधिकाऱ्याचे नाव असुन, कुत्रे आजारी असल्याचा बहाण्याने वरील सहा जणांनी क्राईम पेट्रोल मधील क्राइम स्टोरीच्या कथानकाला लाजवेल असे नियोजन करुन डॉक्टरांचे वडकी येथुन बुधवारी (ता. ०९ऑगष्ट) अपहरण केले होते. अपहरणानंतर डॉक्टरांना एका नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी क्वीड कंपनीचे गाडीत जबरदस्तीने बसवुन, गाडी दिवेघाट मार्गे वाघापुर हद्दीतील वणीकरण्याच्या जागेत नेऊन मारहान केली होती.

मारहाणी दरम्यान डॉक्टरांना तुमच्या पत्नीने व मेहुण्याने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली असल्याचे खोटे कथानक ऐकवले होते.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.प्रदिप जाधव यांना दोन बायका असून, पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. तर डॉक्टर जाधव दुसऱ्या पत्नीसह फुरसुंगी हद्दीतील भेकराईनगर येथे राहण्यास आहेत.
पहिल्या पत्नीच्या केस दरम्यान न्यायालयाने डॉक्टरांना पंचविस लाख रुपयांची एकरकमी पोटगी देण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम देण्यासाठी डॉक्टरांनी घरी रोख रक्कम आनली होती. दरम्यान ही रक्कम देण्यासाठी डॉक्टरांनी पहिल्या पत्नीला संपर्क साधला असता, डॉक्टरांची पहिली पत्नी माहेरी म्हणजे बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे असल्याचे आढळून आले. दरम्यान पहिल्या पत्नीने ही बाब तिच्या माहेरच्या लोकांच्या बरोबर तिची भावजय विद्या नितीन खळदकर हीलाही सांगितली.

 

दरम्यान विद्याचे राहुल निकम रा. इंदापुर यांचे सोबत विवाहबाहय प्रेमसंबंध सुरु होते. विद्याला नवऱ्याला सोडुन राहुल बरोबर संसार करावयाचा होता. पण पैशाची अडचन असल्याने, राहुल टाळत होता. विद्याने नंदेच्या नवऱ्याकडे म्हणजेच डॉक्टरच्या घरात पंचविस लाख रुपयाची रक्कम असल्याची माहिती देताच, राहुल व विद्याने वरील प्लॅन आखला व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अंमलात आणले मात्र लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या कौशल्यामुळे व पोलीस अंमलदार संभाजी देवीकर, श्रीनाथ जाधव, बाजीराव वीर शैलेश कुदळे यांचे साहायाने तांत्रिक विश्लेषणामुळे वरील आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.