पुण्यात मोठी कारवाई! कोथरूडमध्ये ₹11.84 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांना अटक

Rokhthok Maharashtra 30 0

पुण्यातील कोथरूड परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. या कारवाईत तब्बल ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोथरूड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयित टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल पान मसाला आणि वी-१ तंबाखू आढळून आली.
या प्रकरणी दिनेश लुणीया (वय ३२) आणि अनुजकुमार राजपुरोहित (वय १९) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात आरोपी कोथरूड परिसरातील पानटपरी चालकांना विक्रीसाठी हा माल पुरवत असल्याचे समोर आले आहे.
या कारवाईत एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कोथरूड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.