आणखी एक भोंदू बाबा अटकेत! महाराष्ट्र हादरलं

Rokhthok Maharashtra 2 0

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात आणखी एका भोंदू बाबाचं पितळ उघड झालं आहे. मंजूनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरात सक्रिय असलेला हा आरोपी स्वतःला तांत्रिक सांगून लोकांमध्ये भीती निर्माण करत होता. “वाईट शक्तीचा प्रभाव आहे” असं सांगत तो पूजा, तंत्र-मंत्राच्या नावाखाली लोकांकडून लाखो-कोट्यवधी रुपये उकळत होता.

संतानप्राप्ती, व्यवसायात यश आणि आजारातून सुटका अशा आमिषांद्वारे अनेकांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. तपासात उघड झालं की, हा पैसा धार्मिक कार्यासाठी न वापरता जुगार आणि चैनीसाठी खर्च केला जात होता.

ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला गोव्यातील कॅसिनोमधून अटक केली.

सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.