खराडी हॉटेल गोंधळ CCTV मध्ये कैद! दारूच्या नशेत चार्टर्ड अकाऊंटंटचा मोठा उपद्रव पोलिसांत तक्रार!

Rokhthok Maharashtra 33 0

खराडी, पुणे — मंगळवारी रात्री खराडीतील एका हॉटेलमध्ये जोरदार गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण घटना हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून सुरक्षितेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
योगेश काळे नावाच्या व्यक्तीने, जो चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचे सांगितले जाते, दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

 

साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी नशेत टेबल-खुर्चींना लाथ मारून बाजूला ढकलले, ज्यामुळे हॉटेलमधील वातावरण काही काळासाठी बिघडले.

हॉटेल व्यवस्थापनाने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात खराडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून फिर्यादी म्हणून भरत शांतीदास कुमार यांनी तक्रार नोंदवली आहे.
आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटनेनंतर परिसरात सार्वजनिक ठिकाणी संयम आणि शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.