तमाशा सम्राज्ञी विठाबाईंचं दुःखद आयुष्य! लग्नानंतर सहन केला अमानुष छळ

Rokhthok Maharashtra 28 0

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर… ज्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं. पण रंगमंचावर टाळ्यांचा गजर मिळवणाऱ्या या महान कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र दुःखाचाच डोंगर होता.
अत्यंत गरिबीत वाढलेल्या विठाबाईंनी लहान वयातच पायात घुंगरू बांधून तमाशाच्या फडावर नृत्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कलेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आणि राज्य शासनानेही त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
मात्र, लग्नानंतर त्यांचे आयुष्य बदलले. विठाबाई यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे पती त्यांचा छळ करायचे. त्यांच्या कार्यक्रमातून मिळणारे मानधनही स्वतःकडे ठेवत आणि त्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास देत असल्याचे अनेक कथनांमधून समोर आले आहे.
आज अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटामुळे विठाबाईंच्या संघर्षमय आयुष्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पडद्यावर त्यांचा हा प्रवास किती प्रभावीपणे मांडला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.