धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; कोरेगाव पार्कमधील पार्टी ठरली धक्कादायक

Rokhthok Maharashtra 2 0

कोरेगाव पार्क परिसरात एका महिलेवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये पार्टीसाठी आली होती. पार्टीदरम्यान तिची एका अनोळखी व्यक्तीसोबत ओळख झाली. रात्री उशिरा पार्टी संपल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला “घरी सोडतो” असं सांगत आपल्या कारमध्ये बसवलं.

मात्र, मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर कार सुरू असतानाच आरोपीने महिलेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि चालत्या कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घटनेनंतर पीडित महिलेने थेट कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे पुण्यातील पब आणि नाईटलाइफ संस्कृतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सतर्क राहण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.