पाथर्डीत भरदिवसा सोनसाखळी चोरी; महिलेला रस्त्यावर पाडून चोरटे फरार!

Rokhthok Maharashtra 24 0

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात भरदिवसा धाडसी सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. आनंदनगर परिसरात शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले.
सोनसाखळी हिसकावताना चोरट्यांनी जोरदार धक्का दिल्यामुळे महिला रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतर आरोपी क्षणात घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी आणि रस्त्यावर जाताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.