महापालिका कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या! अनैतिक संबंधाच्या संशयातून थरार

Rokhthok Maharashtra 17 0

पुणे पुन्हा हादरलं आहे! कात्रज परिसरात पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
आंबेगाव पठार येथील इंद्रायणीनगरमध्ये राहणारे दीपक क्षीरसागर यांच्यावर रविवारी रात्री धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. दीपक हे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपींनी हा हल्ला केला. सिद्धार्थ हातुरे आणि ऋषिकेश गायकवाड अशी आरोपींची नावे असून, दोघांनाही पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे.
रात्री घरासमोर फेरफटका मारत असताना आरोपींनी दीपक यांच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे कात्रज आणि आंबेगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.