मुंब्रा कनेक्शन उघड | मास्क लावून उपचार, पुन्हा फरार | आज जामीन सुनावणी

Rokhthok Maharashtra 16 0

मास्क लावून आली… उपचार घेतले… आणि पुन्हा गायब झाली!
फरार संशयित निदा खान प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

Mumbra कनेक्शनमुळे या प्रकरणाने आता वेगळीच दिशा घेतली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी निदा खान मुंब्र्यातील एका प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती. यावेळी ती मास्क लावून आली होती.
त्यानंतर तिने ‘बेड रेस्ट’चे वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले… आणि पुन्हा एकदा पोलिसांच्या नजरेआड झाली.

याच प्रमाणपत्राच्या आधारे तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, आज या अर्जावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, National Commission for Women आणि National Human Rights Commission यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
पीडितेला मदत मिळतेय का, याची चौकशी सुरू आहे.

सध्या एसआयटीकडून शोधमोहीम सुरू असून, पुढील काही तासांत या प्रकरणात मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.