पोटदुखीमागचं धक्कादायक सत्य | अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती | सुरक्षा रक्षक फरार

Rokhthok Maharashtra 14 0

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटदुखीची तक्रार असल्यामुळे एक अल्पवयीन मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेली असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर केलेल्या चौकशीत गंभीर प्रकार उघड झाला आहे,.. मुलगी ज्या इमारतीत राहत होती, त्याच ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने तिला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या घटनेमुळे पुणे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.