पुण्यात 43 कोटींचा घोटाळा! वेलेंटिना इंडस्ट्रीजवर गुन्हा

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यात वेलेंटिना इंडस्ट्रीज कंपनीकडून मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सुमारे २ हजार गुंतवणूकदारांकडून तब्बल ४३ कोटी रुपयांच्या ठेवी घेऊन परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरगे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. कर्वे रोडवरील कार्यालयासह त्यांच्या घरांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन पैसे उकळल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.