*शाळेचं निकृष्ट बांधकाम! विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?*

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भाम्बार्डे गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“मॉडेल स्कूल, झेडपी स्कूल भाम्बार्डे” येथे सुरू असलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली आहे.
तक्रारीनुसार, बांधकामादरम्यान आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा वापरच करण्यात आलेला नाही. त्यामुळे इमारतीच्या मजबुतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी तांत्रिक अभियंत्यांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून, बांधकामाचे तात्काळ निरीक्षण, संरचनात्मक तपासणी आणि दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, तपासणी पूर्ण होईपर्यंत हे बांधकाम तात्काळ थांबवावे, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीला ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शवला असून खालील नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे:
गणेश भिमराव यादव, संजय चंद्रकांत माळवे, निलेश विलास अवतार, शंकर चिंतामण वायकर, मारुती रामभाऊ गायकवाड, तानाजी गेनू दिधे, मयूरी हिरामण कुंभार, स्नेहल गणेश यादव, अदिती धोंडू दिधे, वरद अतुल कुंभार, स्वराज मनोन मोरे, चंद्रकांत कैलास कोंढेकर, स्वराज महेश कोंढेकर.
आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.