लोणीकंदमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा! CCTV पासवर्डच्या वादातून मोठ्या भावाला मारहाण

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील लोणीकंद परिसरात कौटुंबिक वादातून धक्कादायक मारहाणीची घटना समोर आली आहे. शंकर रामचंद्र भूमकर या माजी जिल्हा परिषद सदस्याने आपल्या मुलासह मोठ्या भावाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मोठे भाऊ उद्धव रामचंद्र भूमकर यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भूमकर कुटुंबीयांचे रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे महाविद्यालय आहे. कॉलेजमधील CCTV कॅमेऱ्याचा पासवर्ड बदलण्यात आल्याने आणि आर्थिक व्यवहारांची माहिती दिली जात नसल्याने उद्धव भूमकर यांनी विचारणा केली होती.
याच मुद्द्यावरून घरात वाद झाला आणि शंकर भूमकर व त्यांचा मुलगा सिद्धांत यांनी उद्धव यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर कठीण वस्तूने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून लोणीकंद पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.