“वाद मिटवण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक ”

Rokhthok Maharashtra 18 0

पुण्यातील स्वारगेट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भोंदू बाबाने वैवाहिक वाद मिटवण्याच्या नावाखाली ४२ वर्षीय महिलेची फसवणूक आणि शोषण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील आरोपी औदुंबर मनोहर गडदे (वय ४३) असून तो स्वतःला ‘देवऋषी बाबा’ म्हणून ओळख करून देत होता.

माहितीनुसार, पीडित महिलेचे पतीसोबत काही वाद होते. हे वाद मिटवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

इतकंच नव्हे, तर नोकरी लावून देणे आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा करून देण्याचे आश्वासन देत त्याने महिलेची तब्बल ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली.

हा प्रकार २०२१ ते २०२६ या कालावधीत सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.

अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा भोंदू लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.