“५ रक्तदात्यांची तातडीची गरज… अडचणीत सापडलेल्या रुग्णाला अक्षय चव्हाण यांचा जीवनदायी आधार!”

Rokhthok Maharashtra 20 0

बार्शी तालुक्यातील विठ्ठल सूर्यभान अवधूत हे गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या गंभीर आजाराशी झुंज देत असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती.

उपचारादरम्यान डॉक्टरांनी तातडीने पाच रक्तदात्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांनी रयत विद्यार्थी विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन अक्षय चव्हाण यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला.

त्यांच्या प्रयत्नांतून अल्पावधीतच तीन रक्तदाते उपलब्ध करून देण्यात आले. मात्र उर्वरित दोन रक्तदाते मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे रुग्णाच्या डिस्चार्ज प्रक्रियेत अडथळे येत होते.

या पार्श्वभूमीवर अक्षय चव्हाण यांनी कुटुंबीयांसह कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्या कार्यालयात भेट देत संपूर्ण परिस्थिती मांडली. आमदार भोसले यांनी तत्काळ दखल घेत रुग्णाला पुढील उपचारासाठी सोडियम रिप्लेसमेंट सुरू ठेवण्याच्या सूचना देत डिस्चार्ज देण्याचे आदेश दिले.

या संपूर्ण घटनेमुळे अक्षय चव्हाण यांच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

अक्षय चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, गरजू रुग्णांसाठी रक्तदाते उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाजकार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे. “जिथे अन्याय, तिथे अक्षय चव्हाण” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.