अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले

Rokhthok Maharashtra 21 0

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश भाऊ सावंत राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख, केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिव पदी तेजस राऊत, संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम, गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या.

 

यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, राज्य समन्वयक गणेश बोतालजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी,सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्याभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.