एक वर्षापासून फरार आरोपी अखेर जेरबंद; वेल्हे पोलिसांची दमदार कामगिरी

Rokhthok Maharashtra 12 0

पुणे ग्रामीणमध्ये वेल्हे पोलिसांनी एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला कौशल्याने जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे.
लग्नातील भांडणातून झालेल्या वादात बेकायदा जमाव जमवून मारहाण आणि जखमी केल्याप्रकरणी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील इतर आरोपी आधीच अटकेत होते… मात्र मुख्य आरोपी विश्वनाथ ढेबे हा गेल्या एका वर्षापासून फरार होता.
पोलिसांकडे त्याच्याबाबत कोणतीही ठोस माहिती नव्हती.
यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आलं.
पोहवा सोमेश राऊत यांनी गुप्त माहितीच्या आधारे डोणजे, नांदेड सिटी आणि हवेली परिसरात शोधमोहीम राबवली.
अखेर रात्रीच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण कारवाईत वेल्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.