कानिफनाथ घाटात तरुण-तरुणींवर हल्ला करून लूट; 12 तासांत आरोपी जेरबंद!

Rokhthok Maharashtra 27 0

कानिफनाथ गडाच्या घाटातील सिटी व्ह्यू पॉईंटवर तरुण-तरुणींवर हल्ला करून लुटमार करणाऱ्या तिघांना फुरसुंगी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली आहे.आरोपींनी लाठ्या, काठ्या आणि दगडांच्या साहाय्याने हल्ला करत मोबाईल आणि इतर वस्तू लुटल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रतिक फडतरे, ओंकार फडतरे आणि गणेश कामठे यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून स्प्लेंडर मोटारसायकल आणि लुटलेले मोबाईल असा सुमारे 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.