कौटुंबिक वादातून अघोरी मार्गाचा अवलंब? जावयाविरोधात गुन्हा दाखल.

Rokhthok Maharashtra 24 0

पुण्यातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी परत यावी, सासरच्यांनी पैसे द्यावेत आणि सासरच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी एका जावयाने कथित काळी जादू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परवेज अब्दुल अजीज मेमन, रा. हिल मिस्ट गार्डन, कौसरबाग याचे पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होते.
१९ मे रोजी मध्यरात्री कौसरबाग कबरस्तानात परवेज मेमन हा सासरच्या मंडळींच्या फोटोंना सुया टोचून अघोरी विधी करत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी त्याला जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.