दिराला सोडवायचं असेल तर शरीरसुख दे! थेऊरमध्ये विवाहितेला धक्कादायक धमकी, गुन्हा दाखल

Rokhthok Maharashtra 14 0

पुणे जिल्ह्यातील थेऊर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहित महिलेला तिच्या दिराची जेलमधून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी कैलास सावंत याने 16 मे रोजी प्रथम तिच्याकडे अश्लील मागणी केली. त्यानंतर 20 मे आणि पुन्हा 22 मे रोजी तिचा पाठलाग करत माळरानात गाठले. यावेळी आरोपीने महिलेचा हात पकडून पुन्हा शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.
महिलेने विरोध करताच आरोपीने तिला धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला भीतीपोटी गप्प राहिलेल्या महिलेने अखेर कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.