पुणे बनतंय जगातील सर्वात मोठं GCC Hub; IT सेक्टरला मोठा पर्याय!

Rokhthok Maharashtra 3 0

जगभरात IT सेक्टर मोठ्या संकटातून जात असताना… पुण्यासाठी मात्र एक मोठी संधी निर्माण होत आहे!
पुणे आता केवळ IT हब नाही… तर जगातील सर्वात मोठं GCC म्हणजेच ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हब बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण GCC गुंतवणुकीपैकी तब्बल २५ टक्के गुंतवणूक एकट्या पुण्यात होत आहे.
सध्या पुण्यात ३६० पेक्षा जास्त GCC सेंटर्स कार्यरत आहेत… आणि पुढील काही वर्षांत ही संख्या ५०० पार जाण्याची शक्यता आहे.
मग GCC म्हणजे नेमकं काय?
मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या दुसऱ्या देशात टेक्नॉलॉजी, रिसर्च, डेटा, फायनान्स, इंजिनिअरिंग आणि IT संबंधित कामांसाठी जी केंद्र उघडतात… त्यांना GCC हब म्हटलं जातं.
महाराष्ट्र सरकारच्या ‘GCC पॉलिसी 2025’ अंतर्गत राज्यात ४०० नवीन GCC केंद्र उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. यासाठी तब्बल ५० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे.
२०३० पर्यंत ३० लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून… त्यापैकी जवळपास ४ लाख नोकऱ्या पुण्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर सवलत, जमीन, वीज, पाणी आणि संशोधनासाठी अनुदान… यामुळे जगभरातील मोठ्या कंपन्या पुण्याकडे आकर्षित होत आहेत.
म्हणूनच… भविष्यात IT सेक्टरला टक्कर देणारा सर्वात मोठा पर्याय आता पुण्यात तयार होताना दिसत आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.