पुण्यात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू! विषारी दारूचा कहर? हडपसर हादरलं

Rokhthok Maharashtra 10 0

पुण्यातून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. हडपसर परिसरात एकाच दिवशी तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विषारी दारूच्या सेवनामुळे हे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडे या संशयिताला अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात स्पिरिट पुरवठा करण्यामागे वानखेडेचा सहभाग असल्याचा संशय आहे.
मृत व्यक्तींना पोटदुखी, चक्कर येणे आणि प्रकृती बिघडल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र नेमके मृत्यूचे कारण विषारी दारू आहे का, याचा तपास पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
या घटनेमुळे हडपसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.