पुण्यात घरफोडीचा गुन्हा उघड! 3 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त | भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

Rokhthok Maharashtra 14 0

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.
४ जून २०२६ रोजी आंबेगाव पठार परिसरातील जगताप बिल्डिंग येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा माग काढला.
तपासात सराईत आरोपी यश उर्फ पांड्या संतोष कुचेकर, वय २० वर्षे, रा. पद्मावती, पुणे याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, महेश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, मितेश चोरमोले आणि निलेश खैरमोडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.