पुरंदरमध्ये 1.27 कोटींची दारू जप्त! सिंगापूर गावात कंटेनर पकडला, एक आरोपी अटकेत

Rokhthok Maharashtra 17 0

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावाच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली दारू कंटेनरमधून तस्करी केली जात होती. सासवड विभागाच्या पथकाने बेलसर-वाघापूर मार्गावर वाहन तपासणीदरम्यान संशयित कंटेनर अडवला.
तपासणीत 61 हजार 920 सीलबंद बाटल्या, म्हणजेच 1 हजार 290 बॉक्स विदेशी मद्य आढळून आले. या मद्याची किंमत 1 कोटी 11 लाख रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात कैलाशकुमार नानजी पटेल याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.