मामेभावानेच केलं अल्पवयीन बहिणीचं अपहरण! आईला धक्काबुक्की करून मुलीला पळवले.

Rokhthok Maharashtra 1 0

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याने माणुसकी आणि रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडाला आहे. ज्या नात्यात संरक्षण मिळायला हवे होते, त्याच नात्याने आज घात केलाय. एका नराधम मामेभावाने आपल्याच १५ वर्षीय अल्पवयीन बहिणीला घराबाहेरून बळजबरीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.”
“घटनेचा तपशील असा की, आरोपी दुचाकीवरून आपल्या आत्याच्या घरी पोहोचला. घरात प्रवेश करताच कोणताही विचार न करता त्याने आपल्या अल्पवयीन बहिणीचा हात धरून तिला घराबाहेर ओढायला सुरुवात केली. जेव्हा हतबल आईने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या मुजोर भाच्याने स्वतःच्या आत्यालाच जोरदार धक्काबुक्की करून खाली पाडले आणि जखमी अवस्थेत सोडून दिले. अवघ्या १५ वर्षांच्या या मुलीला आरोपीने बळजबरीने दुचाकीवर बसवून तिथून पोबारा केला.”

“या घटनेनंतर संपूर्ण गेवराई तालुक्यात संतापाची लाट आहे. पीडितेच्या आईने चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत.”
“नात्यातील मर्यादा ओलांडणाऱ्या अशा नराधमाला कठोर शिक्षा होणार का? आणि ती अल्पवयीन मुलगी सुखरूप परतणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.