मोक्का कायदाअंतर्गत अटक, आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादा नंतर मुख्य आरोपीस जामीन मंजुर – प्रतिनिधि -स्वप्नील कदम

Rokhthok Maharashtra 4 0

पुणे- (सिंहगड रोड) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दहशत माजवून जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणातील आरोपी विनोद शिवाजी जामदारे (रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) व त्याचे इतर साथीदार यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मोक्का’ कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती, यापूर्वी देखील आरोपीवर खून ,खुनाचा प्रयत्न , दरोडा, अपहरण, अपहरण करून खंडणी मागणे, या सारखे ९ गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, तसेच आरोपी हा संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख मोरख्या होता. सदरील कार्यवाही नंतर आरोपी हा येरवडा कारागृहात पाठवण्यात आले होते.

यावेळी आरोपीने ॲड.आदेश चव्हाण, ॲड. धनंजय काळभोर ,ॲड. सुलेमान शेख यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
आरोपींच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.