शरद पवार यांचा मोठा निर्णय! Rohit Pawar यांना मोठी जबाबदारी; 6 वर्षांच्या कामाची पोचपावती

Rokhthok Maharashtra 2 0

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चांदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे!
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
स्वतः रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आणि शरद पवारांचे आभार मानले.
गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या शरद पवार भेटीनंतर रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानेही चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र आता शरद पवारांनी रोहित पवारांवर मोठी जबाबदारी सोपवत स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवार यांची 2026 ते 2029 या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली आहे.
रोहित पवार म्हणाले,
‘गेल्या सहा वर्षांपासून सदस्य म्हणून केलेल्या कामाची ही पोचपावती आहे.’
तर शरद पवार यांनीही AI तंत्रज्ञान स्वीकारून रयत संस्था जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
राजकीय वर्तुळात आता या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.