संत एकनाथांनी ज्ञानी आणि अज्ञानीयांच्या उत्कर्षासाठी कार्य केले – ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी

Rokhthok Maharashtra 20 0

पुणे (सुधीर मेथेकर)

स्वधर्म करणं अवघड अवताना, देव धर्माला लावणं एवढेच कार्य नाथांचे नव्हे तर ज्ञानी आणि अज्ञांनीयाच्या उत्कर्षासाठी कार्य केले ते आपल्याला विसरता येगार नाही असे मत ह.भ.प. योगीराज महाराज यांनी ऋग्वेद भूषण पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.

देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा ऋग्वेद भूषण पुरस्कार शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे १४वे वंशज ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी यांना प्रदान करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते. या २४ व्या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, शाल-श्रीफळ, स्मृती चिन्हन, रोख रक्कम असे होते.

व्यासपिठावर सत्कार मूर्ती सह संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत देशपांडे, विश्वस्थ उपस्थित होते. या पुरस्कारा बरोबरच सवाई गंधर्वाच्या कन्या कै. प्रमिलाताई वसंत देशपांडे स्मरणार्थ देण्यात येणारा संगीत पुरस्कार जयदीप वैद्य यांना, कै.सरदार आबासाहेब मुजुमदार स्मरणार्थ देण्यात येणारा समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र ब्राम्हण सभा, पुणे या संस्थेस तर ऋग्वेद पुरस्कार श्रीनिधी स्वानंद धायगुडे यांना तसेच डॉ. आमोद साने (विज्ञान संशोधन), विक्रम हुंडेकर ( आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ), महेश मंगेश तेंडूलकर (इतिहास संशोधन, साहित्य), रघुनाथ ढोले (आदर्श समाज सेवा), चंद्रशेखर जोशी (सर्वोदय) आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन सचिव सुनील पारखी यांनी केले.

पुरस्कार तीन प्रकराने दिले जातात ते म्हणजे प्रेरणा देण्यासाठी, चालू कार्याचे मुल्यमापन करून जाणि तीसरे म्हणजे विविध क्षेत्रातील खुप मोठं कार्यासाठी. मला मात्र देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थने दिलेला पुरस्कार माझ्या कार्यालय प्रेरणा देण्यासाठीच असावा असे मत व्यक्त करून योगीराज म्हणाले कुठल्याही संस्थेने समाजातील सर्व घटकांसाठी कार्य करायला हवे असे संकेत असतात त्या प्रमाणे ही संस्था कार्यरत आहे याचा नक्कीच अभिमान वाटतो. संत एकनाथांनी परमार्थ आणि संसाराची एकरूपता जपली व त्या प्रमाणे प्रबोधन केले असे सांगून प्रसंगी संस्थेच्यावतीने देण्यात आलेली पुरस्काराची रक्कम संस्थेच्या कार्यासाठी परत दिली. आभार अनिल पानसे यांनी मानले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.