“सांगलीत अघोरी प्रकार! स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली 😱”

Rokhthok Maharashtra 17 0

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेणे गावातील स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळी काही नागरिकांना स्मशानभूमी परिसरात काळी बाहुली, लिंबू, सुया, नारळ आणि काळं कापड अशा वस्तू आढळून आल्या. या वस्तू पाहून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकारावर प्रतिक्रिया देत असे सांगितले की, अशा अघोरी कृत्यांमुळे कोणाचेही भले-वाईट होत नाही. हे केवळ लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार आहेत.

या घटनेचा तपास करण्याची मागणी करण्यात आली असून, नागरिकांना भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.