“दिवंगत सरपंचांच्या घरात चोरी… गावात खळबळ!”

Rokhthok Maharashtra 15 0

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याची माहिती मिळाली आहे.

घरात कुटुंबीय झोपलेले असतानाच चोरट्यांनी हा डाव साधला. सकाळी उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

या घटनेनंतर केज पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे.

फक्त देशमुख कुटुंबच नाही, तर गावातील 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. काही घरांमधून सोनं आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.

तसेच, तलाव परिसरातून शेतकऱ्यांचे कॉपर केबलही चोरून नेण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 7 लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके कामाला लागली आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.