साडेसतरानळीत वाहतुकीला दिलासा! अमोल तुपे यांनी स्वखर्चातून हटविली धोकादायक बाभळीची झाडे

Rokhthok Maharashtra 16 0

पुण्यातील साडेसतरानळी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी. वाहतुकीस अडथळा ठरणारी दोन मोठी बाभळीची झाडे आवश्यक परवानगी घेऊन स्वखर्चाने हटविण्यात आली आहेत. अमोल तुपे यांच्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा दूर झाल्याने ग्रामस्थांनी कौतुक केले.

साडेसतरानळी ते केशवनगर, मुंढवा आणि मांजरीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर दोन मोठी बाभळीची झाडे रस्त्याकडे झुकल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी धोका निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली होती.
स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी पुणे महापालिकेची आवश्यक परवानगी घेत ही झाडे स्वखर्चाने हटविली.
विशेष म्हणजे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे हटविण्यापूर्वी आवश्यक वृक्षारोपण करून नियमांचे पालनही करण्यात आले.
या उपक्रमामुळे रस्त्यावरील अडथळा दूर झाला असून आता या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सोयीस्कर झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या पुढाकाराचे स्वागत केले आहे.

विक्रम लोणकर, निशिकांत अहिरे, भूषण तुपे, दिलीप तुपे, सुनील तुपे, संतोष ठाणगे, दिलीप झगडे, प्रशांत जोशी, विजय दरेकर, कुणाल लोणकर,
भारत भंडारी, वकील राहुल बायस, दिलीप आप्पा व्यवहारे, संजय शिंदे, तात्या तुपे, विशाल काकडे,कर्नल कुंभार, कर्नल टी आर आर्या,
कर्नल के एन जोशी, कर्नल अविनाश बोबडे, डॉ.जी.बी. सिंग यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे अमोल तुपे यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.