“सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! प्रफुल्ल पटेल-तटकरे गटाला धक्का |

Rokhthok Maharashtra 2 0

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ! 🚨
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत उलथापालथ झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या पीआर स्ट्रॅटेजीमध्ये मोठा बदल करत, नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीला थेट बाहेरचा रस्ता दाखवल्याचं समोर येत आहे.
👉 हीच ती कंपनी, जी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या शिफारसीवरून पक्षात आली होती. त्यामुळे हा निर्णय म्हणजे या दोन्ही नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय.
👉 पक्षात अशीही चर्चा आहे की, ‘डिझाईन बॉक्स’चा प्रभाव इतका वाढला होता की, काही महत्त्वाच्या निर्णयांमध्येही त्यांचा सहभाग होता.

 

👉 मात्र, अजित पवार यांच्या अनुपस्थितीनंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेत, पहिल्याच मोठ्या निर्णयात हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचं बोललं जातंय.
👉 नरेश अरोरा सध्या नेमके कुठे आहेत? आणि त्यांची भूमिका पुढे काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
📌 या सगळ्या घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट —
राष्ट्रवादीत आता निर्णय घेण्याची पद्धत आणि नेतृत्वाची दिशा बदलत आहे का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.