पुण्यात वसुली एजंटांचा दादागिरीचा कळस! भर रस्त्यात मारहाण; पोलीस आयुक्तांचे कडक आदेश

Rokhthok Maharashtra 20 0

पुण्यातील सोलापूर रोडवरील पंधरा नंबर चौकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून काही रिकव्हरी एजंटांनी एका नागरिकाला भर रस्त्यात मारहाण केली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे.
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना आता त्यांच्या हद्दीतील रिकव्हरी एजंटांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना वसुलीच्या कामात सहभागी करून घेऊ नये, अशा सूचना बँकांना देण्यात येणार आहेत.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रश्न असा आहे — वसुलीच्या नावाखाली अशी दादागिरी किती दिवस चालणार?
तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.