बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून ६.२९ लाखांची फसवणूक!

Rokhthok Maharashtra 33 0

पुण्यातील दिघी परिसरात बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून तब्बल ६.२९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सावंतनगर येथील कृष्णा सिल्वर वर्कशॉपचे मालक निलेश जाधव यांच्याकडून आरोपी विवेक आनंद हातकामकर याने सुरुवातीला ३ लाख रुपये आगाऊ देत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने ५९.८७० ग्रॅम वजनाचे ९.२९ रुपयांचे सोन्याचे दागिने तयार करून घेतले.

https://youtube.com/shorts/T4-PF0brteY

दागिने ताब्यात घेताना उर्वरित ६ लाख २९ हजार ७८० रुपये NEFT ने पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून आरोपी तेथून निघून गेला. मात्र प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा न झाल्याचे लक्षात येताच फसवणूक उघडकीस आली.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.