मिरवणूक पाहून परतणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू!

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाचा बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे.
मृत तरुणाचे नाव शुभम राजू घोडके असे असून तो वडगाव येथील वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक पाहून घरी परतत असताना सिंहगड रोडवरील वृंदावन नर्सरीजवळ ही घटना घडली.

https://youtube.com/shorts/i6odv1Qb5mc

पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्वीच्या भांडणाच्या रागातून काही जणांनी शुभमला ओळखून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. त्याच्या मेव्हण्याने मध्यस्थी करत त्याला वाचवले, मात्र घरी जात असताना शुभमची प्रकृती बिघडली. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पर्वती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून चार ते पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.