म.फुले प्राथमिक-माध्यमिक विद्यालयात विद्युल्लता निंबाळकर मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Rokhthok Maharashtra 33 0

 

हडपसर, (प्रतिनिधी)
महात्मा फुले प्राथमिक माध्यमिक विद्यालय, गोंधळेनगर येथे प्राथमिक शिक्षिका श्रीमती विद्युल्लता निंबाळकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक श्री. बाळासाहेब डफळ उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीला साळुंखे यांनी मानाचा पदभार सांभाळला. शाळेचे सचिव अरविंद जगताप, उपाध्यक्षा कल्पना पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका उज्वला जगताप, माध्यमिक मुख्याध्यापक श्री. बारकुल तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी निंबाळकर मॅडम यांच्या शैक्षणिक योगदानाचा आढावा घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. शाळेच्या वतीने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फेम साडी आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

निंबाळकर मॅडम यांनी शाळेसाठी प्रिंटर भेट देऊन संस्थेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणातील उभारीस हातभार लावला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप व ताकवले सर यांनी उत्तमरित्या पार पाडत कार्यक्रमाला आकर्षक स्वरूप दिले.

या सोहळ्यामुळे शाळेमध्ये भावनिक, उत्साहवर्धक आणि कृतज्ञतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.