लग्नानंतर समोर आलं भयानक सत्य!

Rokhthok Maharashtra 21 0

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लग्नानंतर नवऱ्याच्या विचित्र वागण्यामुळे पत्नीला मोठा धक्का बसला.

महिलेच्या म्हणण्यानुसार, सुहागरातपासूनच नवरा तिच्यापासून दूर राहू लागला.
दोघांच्या मध्ये उशी ठेवून झोपायचा, तर कधी सासूही मध्ये झोपत असल्याचा आरोप आहे.

 

संशय आल्यावर पत्नीने चौकशी केली असता,
नवऱ्याच्या दोन्ही किडन्या निकामी असून तो डायलिसिसवर असल्याचं उघड झालं.

हे सत्य लपवून लग्न केल्याचा आरोप करत,
नवऱ्याने तिच्याकडून किडनी दान करण्याची किंवा माहेरून 30 लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचाही दावा आहे.

याशिवाय, तो आधीच विवाहित असल्याचंही समोर आलं आहे.

या प्रकरणी महिलेने पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून
पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.