वाहनचोरीतील दोन सराईतांना ठोकल्या बेड्या येरवडा पोलिसांची कामगिरी ः दोन लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे ः मोपेड विक्रीसाठी आलेल्या वाहनचोरीतील दोन सराईतांना संशयावरून येरवडा पोलिसांनी अटक केली. यश सागर ओंबाळे (वय २३, रा. कंजारभाट, येरवडा) आणि ओमकार राजेश मोरे (वय २१, रा. रामनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून दोन लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस गस्त घालत असताना दोघेजण मोपेड विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींवर चतुश्रुंगी आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले. येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मोहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्नील घोलप, विजय अडकमोल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.